बहुतेक प्रसिद्ध कंपन्यांच्या मधात भेसळ?

करोना काळात रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक जण मधाचे सेवन करत आहेत. त्यामुळे मधाची मागणी वाढली आहे. मात्र सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हीरोनमेंट रिपोर्ट नुसार बहुतेक बड्या, प्रसिध्द ब्रांडचे मध क्वालिटी टेस्टिंग मध्ये नापास ठरले आहेत. या मधात साखरेचे सिरप बेमालूमपणे मिसळले गेले असून सर्वसामान्य चाचणीत ही भेसळ ओळखणे अशक्य असते. त्यामुळे अशी भेसळ असलेले मध आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत.

विशेष म्हणजे मधात जे साखर सिरप मिक्स केले जात आहे ते चीनी कंपन्या निर्यात करतात. हे सिरप खास प्रकारे तयार केले जाते आणि त्यामुळे भारतीय प्रयोगशाळेत चाचणी दरम्यान ते सहजासहजी ओळखता येत नाही. फेब्रुवारी मध्ये व्यापार उद्योग मंत्रालयाने जो मध निर्यात केला जातो याच्या अतिरिक्त चाचण्या विशेष प्रयोगशाळेत करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जर्मनीच्या सहाय्याने या चाचण्या केल्या गेल्या. सरकारला जेव्हा काही शंका वाटते तेव्हा अश्या चाचण्या केल्या जातात असे समजते.

या चाचण्यात १३ प्रमुख ब्रांडचे नमुने फेल झाले असून या कंपन्यांच्या मधात ७७ टक्के भेसळ असल्याचे दिसून आले आहे. चीनी ऑनलाईन पोर्टल कंपन्यांनी केलेल्या दाव्यानुसार या कंपन्या जे सिरप तयार करतात ते शुगर टेस्ट मध्ये सहज पास होते. भारतात चीन फ्रुक्टोज सिरपची निर्यात करतो. औद्योगिक वापरासाठी भारत ही आयात करतो त्यामुळे व्यवहारात ही आयात वैध व्यवसाय दिसते. या सिरप ला ऑल पास सिरप या नावाने ओळखले जाते.

मधात जादा प्रमाणात साखर सिरप मिसळले तर त्यामुळे वजनवाढ होण्याची भीती असते आणि करोना काळात जादा वजन असणाऱ्यांना करोना संसर्गाचा अधिक धोका आहे असा इशारा दिला जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही