अनिल अंबानी रिलायंस समूह कंपन्या अधिग्रहणासाठी ८ कंपन्यात स्पर्धा

फोटो साभार फायनान्शियल टाईम्स

उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायंस समूहातील रिलायंस कॅपिटल कंपनी अधिग्रहणासाठी अमेरिकेच्या ओकट्री व जेसीफ्लावर समवेत आठ कंपन्या स्पर्धेत असल्याचे समजते. आरसीएल मध्ये पूर्ण अथवा काही हिस्सा खरेदी करण्यासाठी पत्रे पाठविली गेली होती त्याला या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.

रिलायंस कॅपिटल मध्ये रिलायंस जनरल इन्शुरन्स, रिलायंस निप्पान लाईफ इन्शुरन्स, रिलायंस सिक्युरिटीज, रिलायंस फ़िनन्शिअल लिमिटेड, रिलायंस अॅसेट रीकन्स्ट्रक्शन या कंपन्या येतात. आरसीआय समूहाच्या २० हजार कोटी कर्जापैकी ९३ टक्के कर्ज याच कंपन्यांवर आहे. कंपन्या अधिग्रहणासाठी निविदा १ डिसेंबर पर्यंत मागविल्या गेल्या होत्या त्याला प्रतिसाद म्हणून ६० बोली लागल्या आहेत.

रिलायंस जनरल इन्शुरन्सच्या १०० टक्के हिस्स्यासाठी १८ कंपन्यांनी बोली लावली असून त्यात क्रायस्पॅक, जेसी फ्लावर, ब्लॅकस्टोन, केकेआर यांचा समावेश आहे. रिलायंस निप्पान लाईफ इन्शुरन्स मध्ये ५१ टक्के भागीदारीसाठी डाबर इन्व्हेस्टमेंट, बंधन बँक, बेन काउंटी आणि काही स्थानिक म्युचुअल फंड कंपन्यांनी रुची दाखविली आहे. या कंपनीत जपानच्या निप्पानचा ४९ टक्के हिस्सा आहे.