खेड मधील ग्रामस्थाने १.१० कोटींना विकत घेतली दाऊदची मालमत्ता


रत्नागिरी – कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या रत्नागिरी येथील मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून खरेदी केली आहे. तब्बल १ कोटी १० लाखांना रवींद्र काते यांनी दाऊदची मालमत्ता खरेदी केली आहे. मंगळवारी मुंबईत दाऊदच्या रत्नागिरीतील मालमत्तेचा ऑनलाइन लिलाव पार पडला, यात रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावली.

काही दिवसांपूर्वी या जागेची स्मगलिंक अँड फॉरन एक्स्जेंज मॅनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर १ कोटी ९ लाखांच्या या जागेची किंमत घरात निश्चित करण्यात आली होती. याआधी दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा १० नोव्हेंबरला लिलाव झाला होता. पण रत्नागिरीतील जागेचा लिलाव होणे बाकी होते. अखेर १ डिसेंबर रोजी या जागेचा लिलाव करण्यात आला आहे. याआधी अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना दाऊदची रत्नागिरीतील हवेली विकण्यात आली होती.