पंकजा मुंडेंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह


बीड – पदवीधर विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची तब्येत या निवडणुकीच्या ऐन एकदिवस आधी अचानक खराब झाली होती. त्यांनी यानंतर याची ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती. आता आपल्या तब्येतीविषयची अपडेट त्यांनी दिले आहे. माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे, त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी’

कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!! मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा एकदा टेस्ट करेन. त्यानंतरच मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावेन.