अखेर ती आनंदवार्ता आली; ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून कोरोना लसीकरणास प्रारंभ


ब्रिटन – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटापासून मुक्तता होण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत असतानाच अनेक देश कोरोना प्रतिबंधक लस तयार करत आहेत. त्यातच ही लस कधी वापरात येणार ही आनंदवार्ता ऐकण्यासाठी संपूर्ण जगाचे कान आसुसलेले होते, पण अखेर ती आनंदवार्ता आली आहे. पुढील आठवड्यात कोरोनावरील जगातील पहिली लस उपलब्ध होणार असून फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटन सरकारने परवानगी दिली असून, ही लस ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. ब्रिटन हा कोरोनावरील लसीला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे.

तर दूसरीकडे आपात्कालीन वापरासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार कोरोना संसर्गावर ही लस 94.1% परिणामकारक असल्याचे दिसून आले. तर ही लस काही प्रौढ रुग्णांमध्ये 100% प्रभावी असल्याचे निर्दशनास आले आहे. ही लस मॉडर्ना कंपनी आणि अमेरिका सरकारची राष्ट्रीय आरोग्य संस्था ही एकत्रिपणे विकसित करत आहे.