क्रिकेटपटूंचा फादर्स डे आउट

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या चार कसोटी सामन्यात सहभागी असलेले कसोटीपटू चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे, रविचंद्रन अश्विन यांचा एक खास फोटो ऑफ स्पिनर अश्विन याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हाच फोटो अजिंक्यने वेगळ्या कॅप्शनसह शेअर केला आहे. या फोटोत हे क्रिकेटपटू त्यांच्या मुलांसोबत पार्क मध्ये फिरायला गेल्याचे दिसत आहे.

अश्विनने फोटो खाली फादर्स डे आउट वुईथ बेबीज असे कॅप्शन दिले आहे. हे तिघेही ऑस्ट्रेलियात होत असलेल्या मर्यादित षटक सामन्यात सहभागी नाहीत. त्यामुळे कुटुंबासोबत ते थोडा क्वालिटी टाईम घालवीत आहेत. हा फोटो सिडने येथील आहे. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली सध्या पितृत्व रजेवर असून लवकरच त्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. विराट सध्या पत्नी अनुष्काच्या बरोबर वेळ घालवीत आहे.