आयफोन संदर्भात खोटे दावे केल्याप्रकरणी अॅपलला ८८ कोटींचा दंड

 

फोटो साभार पत्रिका

अमेरिकन टेक कंपनी अॅपल ला आयफोन संदर्भात दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी पुन्हा एकदा दंड भरण्याची पाळी आली आहे. यावेळी इटलीच्या अँटीट्रस्ट अॅथॉरिटी एजीसीएम ने आयफोन वॉटर रेझिस्टंट क्षमतेबाबत खोटे, दिशाभूल करणारे दावे केल्याचा आरोप करून १० दशलक्ष युरो म्हणजे ८८ कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अॅपलने आयफोनची जाहिरात करताना ४ मीटर पाण्यात ३० मिनिटे पर्यंत फोन वॉटर रेझिस्टंट आहे असे म्हटले आहे पण कंपनीच्या डीसक्लेमर मध्ये मात्र तरल पदार्थाने फोनला नुकसान झाल्यास वॉरन्टी कव्हर मिळणार नाही असे नमूद केले आहे. म्हणजे अॅपलने आयफोन बाबत दिशाभूल करणारे दावे केले आहेत. आयफोनचे वॉटर रेझिस्टंट फिचर कोणत्या परिस्थितीत काम करेल याचा कुठेही उल्लेख आलेला नाही तसेच कंपनीचा हा दावा काही ठराविक स्थितीतच खरा असल्याचे दिसून आले आहे. ही ग्राहकांची एक प्रकारची फसवणूक असल्याचे एजीसीएमचे म्हणणे आहे.

यापूर्वी अॅपलने ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आयफोन स्लो होणारे अॅप अपडेट केले होते त्यावरून कंपनीला ११.३ कोटी डॉलर्स म्हणजे ८३८.९५ कोटी रुपये दंड भरावा लागला आहे.