कोरोनाच्या महासाथीने दहशतवाद्यांना खुले रान


न्यूयॉर्क: जगभरात कोरोनाच्या महासाथीमुळे बहुतेक शासकीय यंत्रणा कोरोनाप्रतिबंधक उपक्रमांमध्ये व्यग्र झाल्याने जगाच्या काही भागात दहशतवादी संघटनांना मोकळे रान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महासाथीच्या काळात शासकीय यंत्रणांसाठी शासकीय यंत्रणांचे दहशतवादविरोधी कारवायांवरील लक्ष विचलित झाले असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा विषय प्राधान्याचा बनला आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांना आपल्या कारवाया आणि कार्यक्षेत्र यात वाढ करण्याची आयटी संधी मिळाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात जगभरातच बेरोजगारांची संख्या वाढली असल्याने फायदा दहशतवादी संघटना आपल्या भरतीसाठी करून घेत आहेत. नागरिकांकडून सहानुभूती मिळविण्यासाठी या काळात दहशतवादी संघटनांनी अनेक प्रकारची लोकोपयोगी कामे करण्यास सुरुवात केली आहे. जोवनावश्यक वस्तूंचा अथवा औषधासारख्या वस्तूंचा पुरवठा करून त्या नागरिकांच्या मनात आपल्याबद्दल अनुकूलता निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लिव्हन्ट आणि अल कायदा या संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी घेण्याच्या दिली आहे. त्याचप्रमाणे आपल्या संघटनांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. पाश्चिमात्य देशातील गैर मुस्लीम नागरिकांनी या काळात इस्लामचा स्वीकार करावा, असे आवाहन अल कायदाने केले आहे; तर शासकीय आणि सुरक्षा यंत्रणांवरील ताणाचा फायदा घेऊन जिहादी हल्ले वाढवावे, असे आवाहन ‘आयएसआयएल’ने आपल्या अनुयायांना केले आहे.

अर्थात, या महासाथीच्या काळातील निर्बंधांमुळे दहशतवादी संघटनांच्या कारवायांना काही प्रमाणात मर्यादाही आल्या आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गर्दीचा अभाव असल्याने दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी ठिकाणे निश्चित करणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे. तसेच दीर्घकाळ बाहेर पाडण्यावर आणि खुलेपणाने वावरण्यावरही बंधने असल्याने दहशतवाद्यांना सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून बाहेर वावराने शक्य झालेले नाही. आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर निर्बंध असल्याने विदेशात जाऊन कारवाया करणे या संघटनांना शक्य होत नाही. मात्र, स्थानिक पातळीवर करणाऱ्या गटांच्या कारवाया सुरूच असून या काळात तालिबानच्या अफगाणिस्थानातील कारवायांमध्ये वाढ झाली आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.