मोटो जी फाईव्ह जी लाँच

मोटोरोलाने भारतीय बाजारात कंपनीचा सर्वात स्वस्त, पहिला ५ जी स्मार्टफोन मोटो जी फाईव्ह जी नावाने सादर केला आहे. हा फोन यापूर्वी युरोपच्या बाजारात सादर केला गेला होता. तेव्हा त्याची किंमत २६३०० रुपये होती. भारतीय बाजारात हा फोन २०९९९ रुपयात मिळणार आहे. शिवाय एचडीएफसी कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना त्यावर १ हजार रुपये सुट मिळणार आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ पासून तो विक्रीसाठी फ्लिपकार्ट वर उपलब्ध होत आहे.

या फोनसाठी ६.७ इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईड १० ओएस, स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसर ( हा ५ जी चिपसेट आहे), ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने ती १ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ४८+२+२ चा रिअर कॅमेरा सेट, सेल्फी साठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५ हजार एमएएच बॅटरी, जीएसपीसह बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. शिवाय गुगल असिस्टसाठी वेगळे बटण दिले गेले आहे.