ब्रिटन अर्थमंत्री सुनक यांची पत्नी महाराणी पेक्षा धनवान

फोटो साभार नॅशनल हेराल्ड

ब्रिटनचे अर्थमंत्री आणि भारतातील बलाढ्य इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक संपत्तीची पूर्ण माहिती दिली नाही म्हणून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर पत्नीच्या संपत्ती विषयीची माहिती लापाविल्याचा आरोप केला जात आहे. सुनक यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून स्वतःच्या संपत्तीची कायदेशीर माहिती दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटन मध्ये सर्व मंत्र्यांना संपत्ती घोषित करणे कायद्याने बंधनकारक आहे.

सुनक यांची पत्नी अक्षता यांच्याकडे इन्फोसिस शेअर्सचा ०.९१ टक्के हिस्सा आहे. त्याचे आजचे मूल्य ४३०० कोटी आहे. ऋषी सुनक यांनी त्यांच्या मालकीच्या संपत्तीची माहिती सरकारी रजिस्टर मध्ये दिली आहे पण पत्नीच्या संपत्तीची माहिती दिली नाही त्यावरून हा गदारोळ सुरु झाला आहे. अक्षताच्या संपत्तीचा तपशील उघड झाल्यावर ती ब्रिटन मधील श्रीमंत महिला यादीत १ नंबर वर आली असून ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय हिची संपत्ती ३५०० कोटी असल्याचे कळते. सुनक यांनी त्यांच्या २ हजार कोटीच्या संपत्तीची माहिती यापूर्वी दिली आहे. सुनक आणि अक्षता यांची ओळख ते स्टँडफर्ड विद्यापीठात शिकत असताना झाली होती आणि त्यांच्या विवाह २००९ मध्ये झाला आहे. त्यांना दोन अपत्ये आहेत.