उटा वाळवंटात दिसलेला रहस्यमयी खांब गायब

फोटो साभार नवभारत टाईम्स

अमेरिकेच्या दक्षिणपूर्व वाळवंटात साधारण दोन आठवड्यापूर्वी आढळलेला रहस्यमयी धातूचा चकाकता खांब गायब झाला असल्याने पुन्हा एकदा ही घटना चर्चेत आली आहे. हा खांब परग्रहवासीयांनी लावला होता आणि आता तो त्यानीच काढून नेला असावा या तर्काला सोशल मीडियावर उधाण आले आहे.

या क्षेत्रातील स्टेट क्रू ला १८ नोव्हेंबर रोजी हेलीकॉप्टर मधून मेंढ्या गणती करताना हा विचित्र गुढ खांब नजरेस आला होता आणि त्याचे फोटो जगभर वेगाने व्हाररल झाले होते. १२ फुट उंचीचा हा खांब येथे कसा आला असावा यावर अनेक तर्कवितर्क लढविले गेले होते. फेडरल ब्युरो ऑफ लँड मॅनेजमेंट किंवा स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी याना अजूनही हा खांब येथे कधी, कसा आला आणि अचानक गायब कसा झाला याचा तपास लागलेला नाही. आपल्या रिपोर्ट मध्ये या संस्थेने शनिवारी वेबसाईटवर बेकायदा उभा केलेले स्ट्रक्चर अज्ञात पार्टीने हलविले असल्याचे म्हटले आहे.

या खांबासंदर्भात असाही एक तर्क केला जात होता की ही प्रसिध्द कलाकार जॉन मॅकक्रॅनन याची कलाकृती असावी. त्याच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांनी २००२ मध्येच त्यांच्या कलाकृती दूर निर्जन भागात सोडून देण्याची आणि त्या नंतर हुडकल्या जाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. जॉन आता जिवंत नाही.