चंद्रावरच्या प्रत्येक टॉयलेट साठी १७४ कोटी खर्च?

फोटो साभार लॉजिकल इंडियाना

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर तळ उभारणीची योजना आखली असून त्यानुसार तेथे अंतराळवीरांसाठी नव्या डिझाईनची टॉयलेट बसविली जाणार आहेत. प्रत्येक टॉयलेट साठी २३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १७४ कोटी रुपये खर्च येणार आहे. टॉयलेट साठी येणारा एकूण खर्च १,८६,४८,००० डॉलर्स इतका असल्याचे सांगितले जात आहे.

नव्या डिझाईनने बनविलेल्या या स्वच्छतागृहांच्या चाचण्या अंतराळ स्टेशनवर सुरु असल्याचे समजते. ही स्वच्छतागृहे महिला अंतराळवीरांसाठी अधिक सोयीची असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी जी स्वच्छतागृहे वापरली जात होती त्यांच्यासाठी १९ दशलक्ष डॉलर्स खर्च येत होता.

ही स्वच्छतागृहे इतकी महाग का अशी शंका अनेकांच्या मनात येते. मिळालेल्या माहितीनुसार ही स्वच्छतागृहे आपल्या सर्वसामान्य स्वच्छतागृहांप्रमाणे नसतात तर एखाद्या सुपर स्पेशल व्हॅक्युम क्लीनर प्रमाणे असतात. यासाठी वापरावे लागणारे तंत्रज्ञान खुपच महाग आहे. त्यात पाणी रिसायकल केले जाते तर वेस्ट स्टोर करण्याची सुविधा असते.