swiggy सोबत काम करा आणि घरबसल्या कमवा पैसे


नवी दिल्ली : घरबसल्या एखादा व्यवसाय करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर तुमच्याजवळ एक संधी चालून आली आहे. याद्वारे तुम्हाला घरबसल्या मोठी कमाई करता येऊ शकते. तुम्हाला जर स्वादिष्ट जेवण बनवायला आवडत असेल, तर तुम्ही रोज चांगली रक्कम कमाऊ शकता. स्विगीने या व्यवसायासाठी एका अॅपची सुरुवात केली आहे. या अॅपचे ‘स्विगी डेली’ असे नाव आहे. या अॅपद्वारे सामान्य घरात बनवले जाणारे जेवण ग्राहकांपर्यंत पोहचवले जाणार आहे.

स्वदिष्ठ जेवण बनवणारे याद्वारे चांगली कमाई करू शकतात. कोणतेही रेस्टॉरंट ऑनलाईन खाण्या-पिण्याचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गरज नाही की कोणत्याही गुंतवणूकीची गरज नाही. स्वादिष्ट जेवण बनवणे ही एकच अट या व्यवसायासाठी आहे.

यासाठी तुम्हाला चांगले जेवण घरीच बनवून ते स्विगीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवता येणार आहे. 50 ते 100 रुपयांपर्यंत ‘स्विगी डेली’ने घरी बनवलेल्या या जेवणाची किंमत ठेवली आहे. हे अॅप 3 दिवस, 7 दिवस किंवा संपूर्ण एक महिन्यासाठी सब्सक्राईब करता येणार आहे.

संघटित विक्रेते, घरगुती स्वयंपाकी आणि टिफिनची सेवा देणारे लोक ‘स्विगी डेली’च्या मदतीने घरी बनवलेले जेवण वितरण करण्यास सक्षम होतील.

परवडणाऱ्या किंमतीत, लोकांची घराच्या जेवणाची गरज ‘स्विगी डेली’ अॅप या सुविधेमुळे पूर्ण करतील. गुरुग्राममध्ये सुरू झालेल्या या सेवेचा येणाऱ्या महिन्यात इतर शहरांतही विस्तार केला जाणार आहे.

प्रत्येक प्रकारच्या जेवणासाठी ‘स्विगी डेली’ अॅपवर 30 हून अधिक पर्याय उपलब्ध असतील. यात Homely, Lunchly, Fig, iDabba आणि Caloriesmart यांसारख्या संघटित विक्रेत्यांना सामिल केले जाईल.

त्याचबरोबर Dial a Meal आणि Dailymeals.in सारख्या लोकप्रिय टिफिन सेवांनाही यात सामिल करून घेतले जाणार आहे. ग्राहकांना ‘स्विगी डेली’द्वारे Sumita’s Food Planet, Mrs. Ahmed’s Kitchen आणि Shachi Jain अशा एक्सपर्ट होम शेफच्या पदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.