अर्जेंटिनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून दिएगो मॅराडोनाच्या मृत्यूच्या चौकशीला सुरुवात


अर्जेंटिना – अर्जेंटिना सरकारच्या न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोना यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते यामधून सावरल्यानंतर आपल्या घरी आले होते, तिकडेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भातील आदेशांवर अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या Buenos Aires येथील स्थानिक न्यायाधीशांनी स्वाक्षरी केली आहे. आम्ही मॅराडोना यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे नातेवाईक व जवळीच लोकांचे काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. जे काही पुरावे मॅराडोना यांच्या घरातून मिळाले त्या आधारावर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर लिओपोल्डो ल्युकी यांच्या घराची चौकशी करणे गरजेचे असल्याचे अर्जेंटिनाच्या स्थानिक न्यायिक अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

गुरुवारी मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मॅराडोना यांचे वकील मातिआस मोरीया यांनी केली होती. मॅराडोना यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्स बोलावण्यात आली होती, परंतू अर्धा तास तिला पोहचायला उशीर झाला, तो गुन्हा असल्याची माहिती मातिआस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली.