या देशाचे अनोखे रेकॉर्ड, एक तासात तीन राष्ट्रपती

फोटो साभार झी न्यूज

जगातील सुंदर देशांच्या यादीत सामील असलेल्या मेक्सिको राजकारणात पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण असताना या देशाने त्याच्या इतिहासात नोंदविलेल्या एका जागतिक विक्रमाची आठवण अनेकांना येते आहे. इतिहासाच्या पानातून नोंदल्या गेलेल्या काही घटना अतर्क्य असतात आणि असे होऊच कसे शकते असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात उभा राहतो. मेक्सिको मधील हा प्रसंग असाच अतर्क्य म्हणावा लागेल.

घटना तशी खुपच जुनी म्हणजे १०७ वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी एका तासाच्या अवधीत तीन राष्ट्रपती बनण्याचा प्रकार या देशात घडला आणि तो जागतिक विक्रम ठरला. जगातील या १४ क्रमांकाच्या मोठ्या देशात १९१३ मध्ये राष्ट्रपती फ्रान्सिस्को आय मॅडोरे सत्तेत होते पण काही कारणांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे लगेच पेद्रो लास्कीन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली गेली पण त्यानीही अवघ्या २६ मिनिटात त्यांच्या पदाच्या राजीनामा दिला. त्यामुळे लगोलग विक्टोरीयानो हूएर्टा यांनी हे पद स्वीकारले.

पेद्रो यांचे २६ मिनिटांचे अध्यक्षपद हाही जागतिक विक्रम ठरला. आजही हा विक्रम कायम आहे.