१०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली ‘देवी अन्नपूर्णा’ची मूर्ती कॅनडाहून येणार परत – पंतप्रधान


नवी दिल्ली – आपल्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार होत राहिले आहेत. अशीच एक १०० वर्षांपूर्वीची देवी अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली होती. आता ती मूर्ती पुन्हा भारतात येत असून ही गोष्ट भारतीयांसाठी गर्वाची आहे.

मोदी म्हणाले, आज देशवासियांना मी एक खूशखबरी देत आहे. हे ऐकून प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल की, कॅनडातून भारतात देवी अन्नपूर्णाची एक खूपच जुनी मूर्ती परत येत आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी ही मूर्ती वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. कॅनडा सरकार आणि हे पुण्य कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे मी आभार मानतो.

काशी शहराशी देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीचा खूपच खास संबंध आहे. देवीची मूर्ती आता भारतात परत येणे आपल्या सर्वांसाठी सुखद आहे. आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीसह आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा शिकार झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या मूर्ती या टोळ्या मोठ्या किंमतीत विकतात. यावर भारताकडून आता दावा करण्यात येत आहे. या मूर्ती भारतात आणण्यासाठी भारताने आपले प्रयत्न देखील वाढवण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षात भारत अनेक मूर्ती आणि कलाकृती पुन्हा देशात आणण्यास यशस्वी ठरल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.