या राज्यात विनामास्क आढळल्यास थेट तुरुंगात होणार रवानगी


हिमाचल प्रदेश – कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणे अनिवार्य करण्यात आल्याचे असताना देखील अनेकजण सार्वजनिक ठिकाणी विनामास्कचा फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास अटक करुन थेट तुरुंगात टाकण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले आहेत.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे पालन होत नसल्यामुळे हिमाचल सरकारने कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास वॉरंटशिवाय अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुह्याबद्दल 8 दिवसांचा तुरुंगवास किंवा 5000 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.