‘कपिल शर्मा शो’मधून होणार कॉमेडियन भारती सिंहची हकालपट्टी?


मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणामुळे कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया चर्चेत आहेत. ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली भारती आणि हर्ष यांनी एनसीबीकडे दिल्यानंतर अटकदेखील झाली होती. दोघेही सध्या जामीनावर बाहेर आहेत. भारतीवर या सर्व घटनेमुळे सर्व स्तरातूनआता टीका होऊ लागली आहे. यामुळे आता भारतीवर बंदी घालण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनी टीव्हीने भारतीची ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’मधूनही हकालपट्टी केल्याचे कळत आहे. पण यासंदर्भात अद्याप चॅनेलकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

कपिल शर्मा शोमध्ये भारती दिसणार नसल्याचे समजते. पण कपिलला चॅनेलचा हा निर्णय मान्य नाही. सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भारतीवर बंदी घालू नये, असे कपिलचे म्हणणे आहे. कपिल शर्मा शो हा फॅमिली शो असल्यामुळे या शोमध्ये कोणत्याही वादग्रस्त व्यक्तींचा सहभाग नसावा, अशी चॅनेलची इच्छा आहे. सोनी टीव्हीने एखाद्या कलाकाराशी बंदी घालण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी प्रसिद्ध संगीतकार अनु मलिकवर अनेक सेलिब्रिटींनी ‘मीटू’ प्रकरणात आरोप केले तेव्हा सोनी टीव्हीने त्यांना चॅनेलमधून बाहेरचा मार्ग दाखवला होता.