भारतीय गोलंदाजांची येथेच्छ धुलाई होत असताना डुलकी घेत होते प्रशिक्षक रवि शास्त्री


सिडनी क्रिकेट ग्राउंडवर यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची सलामी जोडी आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी पुन्हा एकदा संघाला भक्कम सुरुवात करून दिली आणि मोठ्या पाया रचला. त्यांच्यानंतर स्टिव्ह स्मिथचे झंझावाती शतक, फिंच-वॉर्नर आणि अखेरीस मार्नस लाबूशेन व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 389 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियासमोर 390 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.


सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व कायम ठेवले आणि स्मिथचे आक्रमक शतक व इतर फलंदाजांनी त्याला दिलेली उत्तम साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एकीकडे भारतीय गोलंदाजांची धुलाई होत असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री काय करत होते माहित आहे का? सध्या रवि शास्त्री यांचा फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. भारतीय प्रशिक्षक ज्यात डुलकी घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर शास्त्री यांचे डुलक्या घेतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि यूजर्स त्यांच्यावर मेम्स बनवून प्रतिक्रिया देत आहेत.