मायक्रोमॅक्सचा आणखी एक बजेट स्मार्टफोन येतोय

फोटो साभार नवभारत टाईम्स

मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारात गेल्या महिन्यात पुनरागमन करून दोन नवे बजेट स्मार्टफोन सादर केले होते. विशेष म्हणजे मायक्रोमॅक्स इन नोट १ चा २४ नोव्हेंबर रोजी सेल सुरु झाल्यावर काही मिनिटात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला होता. यामुळे उमेद मिळालेल्या कंपनीने आणखी एक बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीचा भारतीय बाजारात पुनरागमन केल्यावरचा हा तिसरा फोन असेल.

गॅजेट ३६० च्या रिपोर्ट नुसार हा फोन अँड्राईड १० ओएस ला सपोर्ट करेल आणि मायक्रोमॅक्स इन १ बी गो नावाने तो बाजारात आणला जाईल. २ जीबी रॅम ३२ जीबी मेमरी आणि ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी अश्या दोन व्हेरीयंट मध्ये तो बाजारात आणला जाईल. पहिल्या दोन फोन पेक्षा हा फोन आणखी कमी किमतीत मिळेल असेही संकेत दिले गेले आहेत.