सापांचे अस्तित्व नसलेला देश आयर्लंड

फोटो साभार एनबीसी न्यूज

जगभरात अनेक देशात विविध जातीचे, विषारी, बिनविषारी साप आढळतात. भारतातही अनेक जातीचे साप आहेत. ब्राझील या देशाला सापांचा देश म्हणून ओळखले जाते करण येथे खुपच साप आढळतात. याच्या उलट आयर्लंड हा देश बिनसापांचा देश म्हणून प्रसिद्ध असून या देशात सापांचे अस्तित्व नाही. या मागचे कारण मजेदार आहे.

या देशात साप नसण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ख्रिश्चन धर्म सुरक्षेसाठी सेंट पॅट्रिक नावाच्या एका संताने या देशातील सर्व साप पकडून एकचवेळी समुद्रात फेकून दिले. हे काम तो सतत ४० दिवस उपाशीपोटी करत होता. त्यामुळे या देशात साप पुन्हा आले नाहीत. पण जीवाश्म विभागातील वैज्ञानिकांच्या मते या देशात सापाचे जीवाश्म कधीच सापडलेले नाहीत. अति थंडीमुळे येथे साप जगू शकत नाहीत असा त्यांचा दावा आहे.

आयर्लंड हा देश अनेक कारणांनी अजब मानावा लागेल. येथे मानव असल्याचे पुरावे १२८०० इसवीसन पूर्व सापडले आहेत. या देशात असा एक बार आहे जो इसवी सन ९०० मध्ये सुरु झाला आणि अजूनही तो सुरु आहे. या बारचे नाव सीन्स बार असे आहे. असेही म्हणतात की पृथ्वीवर आज जेवढी धृवीय अस्वले आहेत, त्याच्या पूर्वजांचा शोध घेतला तर आयर्लंड मधील ५० हजार वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या अस्वल मादीचे हे वंशज आहेत असे दिसते.

जगातील सर्वात मोठे, न बुडणारे जहाज असा गौरव झालेले टायटॅनिक जहाज याच देशातील बेलफास्ट मधील जहाज कारखान्यात बांधले गेले होते. पाहिल्याचा प्रवासात हे जहाज १४ एप्रिल १९१२ रोजी बुडाले होते.