रशियाची करोना लस भारतात बनणार

रशियाची करोना लस स्पुटनिक ५ चे उत्पादन हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे केले जाणार असल्याचे समजते. बद्दी येथील पेनेशिया कंपनीबरोबर या संदर्भातील करार झाला असल्याचे वृत्त आहे. डिसेंबर पासून या लसीचे उत्पादन पेनेशिया कंपनीच्या प्रकल्पात सुरु होणार आहे असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर हिमाचल मधील पांवटा येथील मॅनकाईंड कंपनीबरोबर या लसीच्या मार्केटिंग साठी बोलणी सुरु आहेत असेही सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी बद्दी येथील दोन कंपन्या डॉ. रेड्डी आणि हेट्रो बरोबर लस तयार करण्यासंदर्भात चर्चा सुरु होत्या पण आता उत्तर भारतात पेनेशिया या एकमेव कंपनीत स्पुटनिक ५ चे उत्पादन केले जाईल. या संदर्भातले तंत्रज्ञान रशियन कंपनीने पेनेशियाला दिले आहे असेही समजते.