न्युयॉर्क मध्ये होतो गांजाचा जगात सर्वाधिक खप

फोटो साभार डेक्कन क्रोनिकल

जर्मनी मार्केट रिसर्च फर्म एबीसीडीने १२० देशात २०१८ पासून केलेल्या सर्व्हेक्षण आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गांजा अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात विकला जातो असे दिसून आले आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बॉलीवूड मधील गांजेकस कलाकारांची चर्चा सुरु आहेच त्यात अनेक जणांची चौकशी केली जात आहे तर काही जणांना अटक झाली आहे. त्यावरून अमली पदार्थ व्यवसाय पुन्हा चर्चेत आला आहे.

एबीसीडीच्या आकडेवारीनुसार न्युयॉर्क मध्ये दरवर्षी सरासरी ७०,२५२ किलो गांजा विकला जातो. त्या खालोखाल पाकिस्तानच्या कराची मध्ये ३८०५६ किलो गांजा विकला जातो. गांजा खपाच्या १० प्रमुख शहरात दिल्ली आणि मुंबई शहराचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या तुलनेत दिल्लीत दरवर्षी जास्त गांजा विकला जातो. दिल्लीत दरवर्षी सरासरी ३४७०८ किलो तर मुंबईत २९३७४ किलो गांजा विकला जातो.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीनुसार २०१९ या वर्षात ३.४२ लाख किलो गांजा पकडला गेला आणि ३५,३१० लोकांना अटक केली गेली. यात ३५०२६ पुरुष तर २८४ महिलांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षाची आकडेवारी पहिली म्हणजे २०१५ ते २०१९ मध्ये १४.७१ लाख किलो गांजा पकडला गेला आहे. त्यात सर्वाधिक ३.९१ लाख किलो गांजा २०१८ मध्ये पकडला गेला होता.

अमली पदार्थ दोन प्रकारचे असतात. एकामुळे गुंगी येते, त्यात चरस, गांजा, अफू, हेरॉईन, कोकेन, मोर्फिन याचा समावेश होतो तर दुसरा प्रकार मेंदूवर परिणाम करतो त्यात एलएसडी, एमडीएमए, कॅटामाईन याचा समावेश होतो. भारतात अमली पदार्थ व्यसनामुळे दररोज सरासरी २३ मृत्य होतात असे समजते.