याला ओळखलेत? अहो, हा तर अभिषेक बच्चन

अनुराग बसू यांच्या लुडो चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक झाल्याने सुखावलेला बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन पुढच्या चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त झाला असून यात त्याचा पूर्ण मेक ओव्हर झाला आहे. त्याचे बदललेले रूप हैराण करणारे आहे कारण या रुपात त्याला सहज ओळखता येणे अशक्य आहे.

मणिरत्नम याच्या गाजलेल्या गुरु चित्रपटात सुद्धा अभिषेकचा मेक ओव्हर केला गेला होता. त्यानंतर आता नव्या चित्रपटात त्याचा लुक खुपच बदलला गेला आहे. गाजलेल्या ‘कहानी’ या चित्रपटातील एक कॅरेक्टर ‘बॉब बिश्वास’ वर आता पूर्ण लांबीचा चित्रपट बनविला जात असून त्यात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे. सुजोय घोष यांनी कहानीचे दिग्दर्शन केले होते आणि निर्माते होते जयंती गडा. या चित्रपटातील एका कॅरेक्टरवर चित्रपट बनविण्यासाठी गडा यांची रीतसर परवानगी घेतली गेल्याचे समजते.

त्यात मजा अशी की ही परवानगी मिळविण्यासाठी शाहरुखची मदत घेतली गेली आहे. शाहरुख आणि गडा यांचे संबंध जुने आहेत त्याचा उपयोग यावेळी केला गेला. नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजोय यांची कन्या अन्नपूर्णा करणार असून त्यात अभिषेक बरोबर चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसेल. अभिषेक सध्या कोलकाता येथे शुटींग मध्ये व्यस्त असून हे शहर म्हणजे त्याचे दुसरे घर आहे असे तो म्हणतो.