मित्राच्या लग्नात सहा प्रेग्नंट मैत्रिणीसह पोहोचला हा प्रेमवीर

फोटो साभार अमर उजाला

प्रेमाच्या कथा अनेक सांगता येतील. कधी त्या विनोदी असतात तर काही करुण. मात्र थक्क करणाऱ्या प्रेमकथा वारंवार ऐकायला मिळत नाहीत. नायजेरियातील एका प्रेमवीराची कथा अशीच थक्क करणारी आहे. प्ले बॉय अशी ख्याती असलेला आणि त्यामुळेच लोकप्रिय झालेला प्रिटो माईक यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो चर्चेत आला तो एका फोटोमुळे. त्याने मित्र विलियम्स उचेम्बा याच्या लग्नात स्वतःच्या सहा मैत्रिणीसह हजेरी लावली आणि विशेष म्हणजे या सहाजणी एकाचवेळी प्रेग्नंट आहेत. त्यामुळे नवरा नवरी पेक्षा या पाहुण्यांचीच चर्चा अधिक रंगली.

माईकने त्याचे या समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासोबत लिहिलेल्या पोस्ट मध्ये त्याने त्याचे मस्त चाललेय आणि सहा मुलांचा बाप बनत असल्याने तो अतिशय भाग्यवान असल्याचे म्हटले आहे.

त्याच्या या सहा प्रेग्नंट मैत्रिणीपैकी दोन त्याच्या पूर्वीच्या प्रेयसी आहेत आणि बाकीच्या रिलेशनशिप मध्ये आहेत. विशेष म्हणजे या सहा जणी गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. माईकला २०१७ मध्ये महिलांचे अश्लील फोटो पोस्ट केल्याबद्दल अटक झाली होती. तो नेहमीच त्याच्या ग्लॅमरस लाईफचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचे ३ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.