पुतीन यांच्या गर्लफ्रेंडची इतकी आहे कमाई

फोटो साभार द सन

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची गर्लफ्रेंड एलिना कबाएवा ही पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळची चर्चा तिच्या कमाई संदर्भात होते आहे. तिच्या करविवरण प्रत्रातील तपशील नुकताच लिक झाला आहे. त्यानुसार एलिनाची दर वर्षाची कमाई ७५ लाख पौंड म्हणजे ७५ कोटी आहे. रशियात सर्वसामान्य माणसाची वार्षिक कमाई सरासरी ५८६७ पौड आहे. एलिना एका मिडिया कंपनीची मालकीण असल्याची चर्चा आहे. नॅशनल मिडिया ग्रुप या मिडिया हाउस मध्ये पुतीन यांची भागीदारी असल्याचेही सांगितले जाते.

एलिना अतिशय आरामदायी आयुष्य जगते. तिला खेळात रस असून ती रशियाची ऑलिम्पिकमधली गोल्ड मेडलिस्ट जिमनॅस्ट आहे. रशियातील सर्वात लवचिक मुलगी असाही तिचा लौकिक होता. ३७ वर्षीय एलेनाची पुतीन यांच्याबरोबर २००१ मध्ये ओळख झाली तेव्हा ती १८ वर्षाची होती. २००८ पासून तिच्या आणि पुतीन यांच्यातील संबंधांची चर्चा होऊ लागली मात्र रशियाने पुतीन आणि एलिना यांच्यातील संबंध कधीच मान्य केले नाहीत. एलिना पुतीन यांच्या दोन जुळ्या मुलीची आई आहे अशीही चर्चा होते. क्रेमलिन फर्स्ट मिस्ट्रेस असेही तिला म्हटले जाते.

एलिना सहसा कधीच सार्वजनिक जागी दिसत नाही. जिमनास्ट म्हणून करिअर करत असताना तिची डोपिंग टेस्ट पोझिटिव्ह आल्याने तिच्यावर काही काळ बंदी घातली गेली होती.