कंगनाच्या घरावर बर्फाची चादर

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया

बॉलीवूड अभिनेत्री कंगना हिने तिच्या मनाली येथील घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मनाली मध्ये मोसमातील पाहिला हिमवर्षाव झाल्यावर कंगनाच्या घरावर जणू बर्फाची चादर घातली गेल्यासारखे दिसत आहे. कंगनाने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे, माझ्या घराचे काही गारेगार फोटो. घराची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंगनाला हे फोटो पाठविले आहेत. लॉकडाऊन काळात कंगना याच घरात मुक्काम टाकून दीर्घ सुट्टीवर होती. त्यानंतर भावाचे लग्न उरकून ती पुन्हा शुटींग साठी हैदराबाद येथे हजर झाली आहे.

कंगनाच्या थलाइवी आणि तेजस या चित्रपटांचे शुटींग जोरात सुरु असून थलाईवी तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगना मनाली मधला पाहिला हिमवर्षाव मिस करते आहे. घराच्या फोटो सोबत तिने तसे स्पष्ट म्हटले आहे आणि घराचे फोटो शेअर केल्याशिवाय राहवत नाही अशी भावना व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच्या एका पोस्ट मध्ये तिने घर सोडून निघताना घराला बाय म्हणणे जीवावर येते असे लिहिले होते. कंगना सध्या शुटींग मध्ये खूप व्यस्त असल्याने लवकर घरी परतू शकणार नाही. मागच्या पोस्ट मध्ये तिने तिच्या कसोटीच्या काळात आश्रय दिल्याबद्दल हिमालयाला धन्यवाद दिले होते.