ईडीने प्रताप सरनाईकांच्या विनंतीवर घेतला महत्वाचा निर्णय


मुंबई: मंगळवारपासून ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सुरू केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले असून चौकशीसाठी ईडीने उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर आपण सध्या क्वारंटाईन असल्यामुळे पुढच्या आठवड्यात चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. त्यावर प्रताप सरनाईकांना ईडीकडून क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर हजर राहा, असा आदेश देण्यात आला आहे.

कोविड-१९ नियमानुसार सध्या मी क्वारंटाईन असल्यामुळे ईडीच्या कार्यालयात मला चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी असल्यामुळे पुढच्या आठवड्यात दोघांचीही चौकशी करण्यात यावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती.