‘Google Pay’च्या भारतातील युझर्संना मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार नाही कोणतेही शुल्क


नवी दिल्ली : भारतातील ‘Google Pay’च्या युझर्ससाठी एक दिलासादायक बातमी असून काही दिवसांपूर्वी पुढील वर्षापासून गुगल पे वापरताना ठरविक शुल्क मोजावे लागेल असे वृत्त समोर आले होते. पण या बातमीवर स्पष्टीकरण देताना गुगलने म्हटले आहे की, भारतातील गूगल पेच्या ग्राहकांना कोणतेही शुल्क पैसे ट्रान्सफर करण्यासाठी द्यावे लागणार नाही आहे. फक्त अमेरिकेतील गुगल पेच्या ग्राहकांसाठी हा शुल्काबाबतचा नियम असणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी आलेल्या माध्यमांच्या अहवालानुसार Google Pay किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा सध्या देण्यात येते. दरम्यान WEB APP बंद करण्याची घोषणा गुगलकडून नोटीस जारी करत करण्यात आली असून परिणामी 2021 च्या सुरुवातीपासून युजर्स Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही. युजर्सना याकरिता गुगल पेचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे गुगलकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, गुगल पेच्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.