मोदी सरकारच्या क्रौर्याविरोधात उभा ठाकला किसान: राहुल गांधी


नवी दिल्ली: नव्या कृषिकायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी काढलेला ‘चलो दिल्ली’ मोर्चा हरयाणाच्या हद्दीवर अडविण्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. बळाचा वापर करून भाजप आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठींबा व्यक्त केला आहे. मोदी सरकारच्या क्रौर्याला विरोध करत देशातील शेतकरी ठामपाने उभा ठाकला आहे, अशा अर्थाची कविता त्यांनी ट्विटरद्वारे प्रसिद्ध केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारून त्यांना रोखले जात असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याला एक कविताही जोडली आहे.

अजून दिवस उजाडलेला नाही. मात्र, पूर्वेच्या आकाशात उमटलेली लाली जाणवून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होण्यापूर्वीच शेतकरी जागा झाला आहे. काळ्या कायद्यांचा कडकडाट होत आहे. अन्यायाच्या विजांचे थैमान सुरू आहे. मुसळधार पाण्याची बरसात सुरू आहे. तरीही ‘तो थांबत नाही. क्षणाचीही उसंत घेत नाही, अशा अर्थाची ही कविता आहे.