सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय भारतातील अगडबंब संत्रे

फोटो साभार एनडीटीव्ही

संत्रे नगरी असे बिरूद मिरविणारे नागपूर सध्या संत्र्यासंबंधीच्या एका बातमीमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. ऋतू मल्होत्रा यांनी त्याच्या ट्विटर अकौंटवर त्यांच्या नागपूर येथील मित्राच्या संत्रा बागेतील एका संत्र्याचे फोटो शेअर केले असून हे देशातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे संत्रे असल्याचे म्हटले आहे.

या संत्राची रुंदी २४ इंच तर उंची ८ इंच मोजली गेली आहे. या संत्र्याचे वजन २३ नोव्हेंबर रोजी १ किलो ४२५ ग्राम होते असेही म्हटले गेले आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सर्वात मोठ्या संत्रांची नोंद अमेरिकेतील असून ती २२/१०/ २००६ रोजी केली गेली आहे. या संत्र्याचा आकार २५ इंच होता. त्याचे फोटो उपलब्ध आहेत.

ऋतू मल्होत्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकौंट वर शेअर केलेल्या फोटोत संत्र्याची मोजमापे दिसत आहेत मात्र अनेकांचा त्यावर विश्वास बसलेला नाही. त्यांनी टाकलेले फोटो खरे असतील तर हे देशातील सर्वात मोठे संत्रे म्हणून नोंदले जाईल असे सांगितले जात आहे.