नेत्यानाहू , अबुधाबी प्रिन्सच्या नावाची शांतता नोबेल साठी शिफारस

फोटो साभार अमर उजाला

पुढच्या वर्षीच्या नोबेल पारितोषिकात शांतता नोबेल पुरस्कारासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि अबुधाबी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या नावांची शिफारस केली गेली आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी केलेले काम पाहून ही शिफारस केली गेल्याचे समजते.

इस्रायल पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोबेल विजेते लॉर्ड डेविड ट्रिंबले यांनी प्रिन्स आणि नेत्यानाहू यांची उमेदवारी नोबेल शांतता पुरस्कारासाठी जाहीर केली आहे. ट्रिंबले हे आयर्लंडचे मंत्री असून त्यांनी दोन्ही देशातील संघर्षात शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल त्यांना १९९८ मध्ये नोबेल पुरस्कार दिला गेला होता. यामुळे त्यांना या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी अन्य लोकांची निवड करण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.

नोबेल पुरस्कार निवड ही मोठी प्रक्रिया आहे. यापूर्वी इस्रायल, बहारीन, युएई शांती करार प्रकरणी काही राजकीय नेत्यांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली होती.