असे सोडविता येणार करोना लस वाहतुकीचे संकट?

करोना लस लवकरच भारतात उपलब्ध होईल अशी शक्यता वाढली आहे. मात्र त्याचवेळी ही लस साठवून ठेवण्यासाठी लागणारे तापमान हा कळीचा मुद्दा बनला आहे. फायझर आणि अन्य कंपनीच्या लस साठवणुकीसाठी उणे ७० तापमान असलेल्या स्टोरेजची आवश्यकता आहे आणि सध्या तरी भारतात ही सुविधा कोणत्याही वहातूक कंपनीकडे नाही. अर्थात यावर एक उपाय करता येण्यासारखा असून त्यावर विचार केला जात आहे असे समजते,

भारतात बैलाचे वीर्य कृत्रिम रेतानासाठी नेताना डेअरी उद्योग जे तंत्रज्ञान वापरते याचा उपयोग करोना लस वाहतूक करताना होऊ शकेल काय याची चाचपणी केली जात आहे. देशाच्या विविध भागातून ५६ बैल स्टेशन्स असून तेथून गाईचे कृत्रिम गर्भारोपण करण्यासाठी बैलाचे वीर्य आणले जाते. डेअरी उद्योगात दरवर्षी ८ कोटी कृत्रिम गर्भधारणा केल्या जातात. त्यासाठी खास उत्तम जातीचे वळू पाळले जातात. वळूचे स्पर्म गोठवून ते लिक्विड नायट्रोजेन कंटेनर्स मधून नेले जातात. या साठी हे स्पर्म उणे २०० डीग्री तापमानात स्टोर केले जातात.

प्रभात डेअरीचे सीईओ राजीव मिश्रा या संदर्भात म्हणाले कोविड लस उणे ७० डिग्री तापमानात साठवणुकीची गरज आहे आणि देशभर तिची वाहतूक करताना, विशेषतः खेडोपाडी नेताना हे तापमान राखणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे बैल स्पर्म वाहतुकीसाठी जी पद्धत वापरली जाते तीच या लसीच्या वाहतुकीसाठी वापरता येईल का याचा विचार सुरु आहे.