भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; तुरुंगातून नितीश सरकार पाडण्याचा कट रचत आहेत लालू प्रसाद


नवी दिल्ली – भाजप-जदयू प्रणित एनडीएला बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील सरकारही स्थापन झालेले असताना एक मोठा गौप्यस्फोट बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. तुरूंगातून नितीश कुमार यांचं सरकार पाडण्याचा कट लालू प्रसाद यादव हे रचत असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे.

एनडीएने बिहारमध्ये सरकार स्थापन केले असून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ दिवस होत नाही तोच लालू प्रसाद यादव यांच्याकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासंदर्भात एक ट्विट करत बिहारच्या राजकारणात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकु

मार मोदी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

रांचीतील तुरूंगात बसून एनडीएच्या आमदारांना कॉल करून मंत्रीपदाच आश्वासन लालू प्रसाद यादव देत आहेत. मी जेव्हा कॉल केला, तेव्हा तो कॉल थेट लालू प्रसाद यादव यांनी उचलला होता. अशा घाणेरड्या चाली तुरूंगात बसून खेळू नका. यात तुम्हाला यश मिळणार नसल्याचे त्यांना मी सांगितल्याचा दावा सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

लालू प्रसाद यादव यांनी एनडीए आमदारांना केलेल्या कॉलची ऑडिओ रेकॉर्डिंगही मोदी यांनी ट्विट केली आहे. ज्यात लालू प्रसाद यादव सभापती निवडणुकीत एनडीएच्या आमदारांना पाठिंबा देण्याचे सांगत आहेत. कोरोना झाल्याचे सांगून गैरहजर राहावे, असा सल्ला लालू प्रसाद यादव आमदारांना देताना दिसत आहेत.