शिखरने रिव्हील केला टीम इंडियाच्या रेट्रो जर्सीचा लुक


सिडनी – लॉकडाउनपश्चात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला असून ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून या मालिकेत दोन्ही संघ ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या किट स्पॉन्सर्समध्ये बदल करण्यात आले असून MPL हा ब्रँड पुढील ३ वर्षांसाठी टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असणार आहे.
https://www.facebook.com/shikhardhawanofficialpage/posts/1759102240921983
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत रेट्रो जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. या रेट्रो जर्सीचा फर्स्ट लुक सलामीवीर शिखर धवनने रिव्हील केला आहे. टीम इंडियाचे खेळाडू ही जर्सी ८० च्या दशकात घालून मैदानावर उतरायचे. दरम्यान, यंदाच्या मालिकेत रोहित शर्माची संघात निवड न झाल्यामुळे शिखर धवनसमोर मोठे आव्हान असणार आहे.