जगातील श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क दुसऱ्या क्रमांकावर


नवी दिल्ली – बिल गेट्सना मागे टाकत जगातील श्रीमंताच्या यादीत टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलन मस्क यांनी दुसरे स्थान मिळवले आहे. १२७.९ अरब डॉलर्स एवढी ४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ झाली आहे. त्यांचे नेटवर्थ टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने वाढले आहे. आता ४९१ अरब डॉलरपर्यंत टेस्लाची मार्केट व्हॅल्यू पोहचली आहे. एलन मस्क हे जानेवारी महिन्यात जगातील श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते. पण आता एलन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत जगातील श्रीमंताच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.