शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर तसचे कार्यालयावर ईडीचा छापा


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांवर छापा टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर ईडीचे पथक प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील पोहोचल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही कारवाई मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण ईडीकडून अद्याप याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात दाखल झाले आहे. ही कारवाई सकाळी आठ वाजता करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. अद्यापही कारवाई करण्या मागील नेमके कारण समोर आलेले नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.