कोरोना लसीचा काही जणांकडून राजकारणासाठी वापर: मोदी


नवी दिल्ली: करोना प्रतिबंधक लस कधी येणार हातात नाही. ते वैज्ञानिक ठरवू शकतात. मात्र, काही जणांकडून या लसीवरून राजकारण केले जात आहे. आपण असे राजकारण करणाऱ्यांना थांबवू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

करोनाग्रस्तांची संख्या अधिक असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. करोना प्रतिबंधक लस विकसित झाल्याची सकारात्मक बातमी त्याचवेळी देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९१ लाखांचा आकडा ओलांडल्याचे बातमी चिंता वाढविणारी असल्याकडे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथे ऍस्ट्राझेंका- ऑक्सफर्डने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन केले जात आहे. येणाऱ्या वर्षांच्या सुरुवातीला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये १० कोटी लसी उपलब्ध होऊ शकतील. सरकार प्रति लस २५० रुपये या दराने त्या विकत घेईल, अशी माहिती इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे. ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचा ऍस्ट्राझेंकाचा दावा आहे. दोन्ही डोसांची सरासरी काढली असता ही लस ६५ ते ७० टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सीरम देऊन पूनावाला घेणार आहेत. यावेळी ते लसीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावाही घेणार आहेत.