पराभव मान्य करत ट्रम्प यांनी बायडेन यांना दिले सत्तास्थापनेचे निमंत्रण


वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून डोनाल्ड ट्रम्प यांचा या निवडणुकीत पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. पण निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतरही आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दाव्यावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.

तीन ते चार आठवडे अमेरिकेतील निवडणुकाचे निकाल जाहिर होऊन उलटले असून आपल्या बाजूने निकाल येईल असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प वारंवार व्यक्त करत होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी निकाल आल्यानंतरही अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही अजिबात पराभव मान्य करत नव्हते. त्यांनी यासाठी कायदेशीर मार्ग देखील निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.

अमेरिकेच्या जीएसएला सत्तांतरणाच्या प्रक्रियेला डोनाल्ड ट्रम्प यांनी परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा, असे सांगितल्यानंतर जो बायडेन यांना अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी पत्र लिहिले असून सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. जीएसए एमिली मर्फी यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत आभार मानले असून त्यांना धमकावले तसेच छळ केल्याचाही आरोप केला आहे. आपण त्यांच्यासोबत किंवा त्यांचे कुटुंबीय आणि जीएसच्या कर्मचाऱ्यांसोबत असे होताना पाहू शकत नसल्याचेही ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला लढा सुरुच राहील सांगताना विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.