एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सकडून हल्ला


मुंबई – एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सकडून मुंबईतील गोरेगावमध्ये काल संध्याकाळी हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. जेव्हा बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आले तेव्हा अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. एनसीबीचे समीर वानखेडे हे विभागीय संचालक आहेत. त्यांनी बॉलिवूडचे असलेले ड्रग्ज कनेक्शन उघड केले होते. आता त्यांच्यासह त्यांच्या टीमवर हल्ला झाला आहे. तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ड्रग्ज पेडलर्सने एनसीबीच्या टीमवर हल्ला केला आहे. समीर वानखेडेंसह एकजण या हल्ल्यात जखमी झाला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास समीर वानखेडे हे गेले होते. ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. या कारवाईसाठी एकूण पाच लोकांची टीम गेली होती. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आले आहे. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

परवाच कॉमेडियन भारती सिंहला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. त्यानंतर तिचा पती हर्ष लिम्बचिया याचीही कसून चौकशी केली. त्याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांचीही चौकशी केली होती. ड्रग्ज प्रकरणात आधी रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक लोकांची नावे समोर आली.