लवकरच TrueCaller ला पर्याय देणार गुगल


नवी दिल्ली – लवकरच TrueCaller ला पर्याय म्हणून ‘Phone by Google’ हे अ‍ॅप नवीन व्हर्जनमध्ये आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगल आणण्याच्या तयारीत आहे. पण याबाबत अद्याप गुगलकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Google Call असे गुगलच्या या नव्या अ‍ॅपचे नाव असेल. कॉलर आयडी आणि स्पॅम प्रोटेक्शनची सुविधा याद्वारे मिळेल. युट्यूबवरही गुगलच्या या अ‍ॅपची एक जाहिरात आली आहे. पण हे अ‍ॅप अद्याप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध झालेले नाही. हे अ‍ॅप गुगल लवकरच अधिकृतपणे रोलआउट करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “lets you answer with confidence” कॅप्शनचा वापर युट्यूबवरील जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, गुगल फोन अ‍ॅपमध्ये नुकतेच कॉलरचे नाव वाचण्यासह अन्य अनेक नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. या अ‍ॅपमध्ये गुगलने ऑटो डिलेशन फिचरही दिले आहे. 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या कॉलरची हिस्ट्री या फिचरमुळे अ‍ॅपमधून डिलिट होते. “Saved voicemails” चा शॉर्टकटही या अ‍ॅपमध्ये आहे. गुगल फोन अ‍ॅप हे पिक्सेल सीरिजच्या फोनसाठी प्राइमरी डायलर आहे, शिवाय गुगल फोन अ‍ॅप आता नॉन पिक्सेल फोन युजर्ससाठीही उपलब्ध झाले आहे.