या ठिकाणी आजही ब्रिटीश परवानगीशिवाय जाऊ शकत नाहीत भारतीय

फोटो साभार अमर उजाला

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले. आज आपण स्वातंत्राची ७० वर्षे उपभोगतो आहोत पण आपल्याच देशात आजही एक ठिकाण असे आहे जेथे ब्रिटीश परवानगीशिवाय भारतीयांना प्रवेश करता येत नाही. नागालँडची राजधानी कोहिमा येथील कोहिमा युद्ध स्मारक ही ती जागा आहे.

‘येथे येणाऱ्या पर्यटकांची पहिली नजर एका शिळेवर पडते. त्यावर लिहिलेल्या मजकुराने कुणाचेही डोळे पाणावतात. ‘ जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाल तेव्हा आमच्याविषयी सांगा. तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचे वर्तमान कुर्बान केले आहे.’ अश्या ओळी असलेली ही शिळा कोहिमा शहिदांना खरी श्रद्धांजली आहे.

भारताच्या अधिकारात असूनही नसलेली ही जागा जगभरात कोहिमा वॉर सिमेट्री, युद्ध स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धात चिंडविन नदी काठी जपानी सेना आणि आझाद हिंद फौजेने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या २७०० ब्रिटीश जवानांच्या कबरी येथे आहेत. महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या अश्या कबरी जगात जेथे जेथे ब्रिटीश सत्ता होती अश्या ठिकाणी आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडाचाही समावेश आहे. या स्थानांची जबाबदारी कॉमनवेल्थ वॉर ग्रेव कमिशन कडे आहे.

कोहिमा युद्ध स्मारकात फोटो काढायला सुद्धा भारतीयांना परवानगी घ्यावी लागते. गेल्या वर्षी येथील रस्ता रुंद करण्यासाठी या कमिशन कडे भारत सरकारने परवानगी मागितली होती पण ती नाकारली गेली. नेताजी सुभाष चंद्र बोस संस्थेचे पदाधिकारी तमाल सन्याल ही जागा त्यांच्या अधिकारात द्यावी म्हणून भारत सरकारशी बोलणी करत आहेत असेही सांगितले जाते.