‘… तर ऑक्सफर्ड लसीला मिळू शकते तातडीच्या वापराची परवानगी’


नवी दिल्ली: करोनाविरोधी लसीच्या वापरासाठी जर इंग्लंडमध्ये ‘ऍस्ट्राझेंका’ला परवानगी मिळाली भारतीय नियमकांकडून ऑक्सफर्ड लसीला तातडीची बाब म्हणून वापराची परवानगी दिली जाऊ शकते, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य आणि लसीच्या वापराबाबत नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष विनोद पॉल यांनी दिली आहे. जर नियमानुसार चाचण्या घेण्यात आल्या तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्यास पुढील वर्षाचा फेब्रुवारी महिना उलटू शकतो.

ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेंका यांनी करोनाला रोखणारी विकसित केली आहे. त्याचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट येथे करण्यात येत आहे. या लसीच्या चाचण्या सध्या सुरु आहेत.

ऍस्ट्राझेंकाला इंग्लंडमध्ये परवानगी मिळाल्यास भारतात औषध नियमकाकडून ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेंका लसीचा तातडीची बाब म्हणून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपूर्वीच प्रत्यक्ष वापर करण्यास परवानगी देता येणार आहे. तशी परवानगी मिळाल्यास प्राधान्यक्रमातील आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांना या वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होऊ शकणार आहे.