पुणे शहरातील शाळा १३ डिसेंबर तर पिंपरी चिंचवडमधील शाळा नोव्हेंबरअखेपर्यंत बंद


पुणे – नववी ते बारावीपर्यंतचे पुणे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. पण पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा नोव्हेंबरअखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर उद्यापासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. पण शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवाळीनंतर वाढत आहे. त्याचबरोबर दुसरी लाट येण्याची शक्यता शहरात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने व्यक्त केली आहे.