मोदी सरकारच्या या कामाचे रोहित पवारांकडून कौतुक


मुंबई : केंद्र सरकारच्या इथेनॉल क्षेत्रांतील कामाबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


यासंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचे कौतुक करायलाच हवे. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असेच काम होईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी जी-२० परिषदेत कोरोना विरुद्ध कृती करण्याच्या आवाहनावर देखील आनंद व्यक्त केला. पण त्याच वेळी राज्यातील भाजप नेत्यांना देखील टोला लगावला. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी तसेच कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वात मोठे आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचे आवाहन मोदीजींनी #G20Summit परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली, तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील, अशी आशा व्यक्त केली आहे.