अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने जाहिर केली आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत


वॉशिंग्टन – महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोना व्हायरसने पूर्णपणे आपल्या विळख्यात घेतले आहे. याच दरम्यान मॉडर्ना कंपनीने कोरोना प्रतिबंधक लस बनवल्याचा दावा केला असून कंपनीच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी तयार केलेली लस 94 टक्के प्रभावी आहे. त्याचबरोबर कंपनीने म्हटले आहे की कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोससाठी सरकार 25 ते 37 अमेरिकन डॉलर्स आकारेल म्हणजेच लसीसाठी 1,854 ते 2,744 रुपये मॉर्डना कंपनी घेऊ शकते.

जर्मन साप्ताहिक वेल्ट अम सॉन्टाग (डब्ल्यूएएमएस) यांना मोडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी सांगितले की 10 ते 50 डॉलर म्हणजेच 741.63 ते 3,708.13 रुपये आमच्या लसीची किंमत असू शकते. ते म्हणाले की लसीची किंमत ही तिच्या मागणीवर अवलंबून असते.

मोडर्नाबरोबर युरोपियन युनियनला करार करायचा होता. चर्चेत सहभागी झालेल्या युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, लाखो डोसची गरज युरोपियन युनियनला भासणार आहे. अशा परिस्थितीत 25 डॉलरपेक्षा कमी किंमतीच्या म्हणजेच 1,854 पेक्षी कमी किंमतीत युरोपियन युनियनला मोडर्ना कंपनीसोबत करार करायचा होता.

बँन्सेल युरोपियन युनियनशी झालेल्या कराराबाबत म्हणतात की, कोणत्याही गोष्टीवर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही, परंतु आम्ही युरोपियन युनियन कमिशनशी झालेल्या कराराच्या जवळ आहोत, युरोपमध्ये आम्हाला पोहोचायचे आहे आणि करारावर विधायक वाटाघाटी करायच्या आहेत.

मॉडर्नच्या म्हणण्यानुसार, लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतरिम टप्प्यामध्ये त्यांची लस कोरोना रोखण्यासाठी 94.5 टक्के पर्यंत प्रभावी आहे. कंपनी असेही म्हणाली आहे की, त्याची Mrna-1273 लस लवकरच येईल आणि कंपनी या लसीचे दोन कोटी डोसदेखील वर्षाच्या अखेरीस तयार करेल.