नियंत्रण रेषेवर आढळली उडणारी वस्तू: सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरू


श्रीनगर: भारत पाकिस्तान दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आकाशात अनोळखी उडती वस्तू आढळून आली. हे ड्रोन होते की अन्य काही वस्तू याचा तपास सुरक्षा यंत्रणा करीत आहेत.

जम्मू काश्मीरच्या पूछ जिल्ह्यात मेंधर येथे रविवारी सकाळी उडती वस्तू दिसून आली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय भूभागावरील आकाशात ही वस्तू घिरट्या घालत होती. ही वस्तू नेमकी काय होती, याचा तपास सुरक्षा यंत्रणा काटेकोरपणे करीत आहेत.

भारतीय सैन्याने मागील महिन्यात नियंत्रण रेषेवरील केरन विभागात पाक सैन्याचे क्वाडकॉप्टर पडले होते. चिनी बनावटीचे हे क्वाडकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करून आले असता त्याला लक्ष्य करण्यात आले.