भारती आणि हर्ष यांनी गांजा घेत असल्याचे केले कबूल !


मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबीने कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. तर तिचा नवरा हर्ष लिंबाचिया याची चौकशी सुरु होती. भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियालाही आता तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने अटक केली आहे.

दरम्यान भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. भारतीला दुपारी तीन वाजल्यापासून सुरु असलेल्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. आज भारती सिंहला एनसीबी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

एनसीबीने घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम ताब्यात घेतले. भारती सिंह हिला चौकशीनंतर अटक करण्यात आली. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हिची चौकशी केली असता तिने गांजा सेवन केल्याची कबुली दिली. हर्षही एकत्र गांजाचे सेवन करायचा.