‘कोणत्या’ व्यक्तीसोबत लाँग ड्राइव्हला जायला आवडेल प्रश्नावर रोहित पवार म्हणतात


मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री शरद पवार यांचे नातू रोहित पवार उत्तम संघटन, वक्तृत्व आणि माणुसकी या गुणांमुळे लोकप्रिय आहेत. आपल्यापैकी अनेकजण त्यांच्या राजकीय कामगिरीसोबतच खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. रोहित पवार यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोणासोबत लाँग ड्राइव्हला जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यांनी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिल, गाड्यांची मला विशेष आवड आहे. मी भावंडांसोबत, ठराविक मित्रांसोबत फिरायला जातो. पण मला लाँग ड्राइव्हसाठी पत्नी कुंतीसोबत जायला आवडते. मुले गाडीमध्ये मागे बसतात आणि त्यांच्यात थोड्या वेळानंतर पुढे कोण बसणार यावरुन भांडणे होतात आणि त्यात डेस्टिनेशन कधी येते हेच कळत नाही. लाँग ड्राइव्हला जायची आवड असली तरी व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नाही.

फावल्या वेळेत फेसबुक, ट्विटर किंवा सोशल मीडिया पाहण्यापेक्षा कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे आवडते, असे देखील त्यांनी म्हटले आहे. मुलांसोबत कार्टून बघायला मला आवडते. कारण यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो आणि माझ्याही लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर येतात, असे त्यांनी म्हटले.