प्रमुख राजकीय नेत्यांना करोना बॉम्बचा धोका?

फोटो साभार साक्षी समाचार

करोना विषाणूचे जगभर थैमान सुरु आहेच पण आता करोना बॉम्ब हा आणखी नवा धोका जगभरातील प्रमुख देशप्रमुख, राजकीय नेते, पंतप्रधान याना निर्माण झाल्याचा इशारा इंटरपोलने दिला आहे. इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार तपास पोलीस संघटना असून जगभरातील देशांच्या सुरक्षा संस्थांना त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

जगातील अनेक राष्ट्रप्रमुखाना लेटर बॉम्ब पाठविले जाण्याचा प्रकार आता नवा नाही. मात्र आता करोना विषाणू असलेली कागदपत्रे पाठविली जात असल्याचे इंटरपोलचे म्हणणे आहे. अशी काही कागदपत्रे इंटरपोलच्या हाती लागली आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख देशांनी त्यांच्या महत्वाच्या नेत्यांसाठी आलेल्या पत्रांबाबत सावधानता बाळगून त्यावर कोविड १९ विषाणू नाही याची खात्री करून घ्यावी असे आवाहन केले गेले आहे.

असा धोका असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. लोकप्रिय राष्ट्रपती, पंतप्रधान याना कोविड १९ विषाणू असलेली पत्रे पाठविण्याचा एक मोठा कट रचला गेल्याचे इंटरपोलचे म्हणणे आहे. यापूर्वी महत्वाचे नेते, अधिकारी यांच्या जवळ जाऊन करोना बाधिताने मुद्दाम खोकणे किंवा थुंकणे असे प्रकार घडले असल्याचे समजते.